Posts

जीवनाच्या चार मुक्ती (The Four Liberations of Life)

Image
 ' मुक्ती ' म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळवून परमात्म्याला प्राप्त करणे. हे चार प्रकार म्हणजे साधकाच्या भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे वेगवेगळे स्तर आहेत. ते खालीलप्रमाणे: जीवनाच्या चार मुक्ती (The Four Liberations of Life) हे चार प्रकार म्हणजे परमात्म्याशी (ईश्वराशी) एकरूप होण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. १. सालोक्य मुक्ती (Salokya Mukti) अर्थ: 'समान लोक' म्हणजे देवाच्या जगात किंवा लोकात वास करणे. स्वरूप: या मुक्तीमध्ये भक्ताला मृत्यूनंतर भगवंताच्या धामात (जसे की वैकुंठ, गोलोक, कैलास) स्थान मिळते. तो देवाच्या सानिध्यात, त्याच जगात राहतो, पण तो देव नसतो. तो देवाच्या वैभवाचा आणि दिव्य वातावरणाचा अनुभव घेतो. उदाहरण: जसे एखाद्या महान राजाच्या राज्यात तुम्हाला नागरिक म्हणून राहण्याची संधी मिळणे. तुम्ही राजाच्या जवळ नसता, पण त्याच्या राज्यात आनंदाने राहता. २. सामीप्य मुक्ती (Samipya Mukti) अर्थ: 'समीप' म्हणजे देवाच्या जवळ राहणे. स्वरूप: ही सालोक्य मुक्तीच्या पुढची पायरी आहे. इथे भक्त फक्त देवाच्या लोकात राहत नाही, तर तो देवाच्या अगदी जवळ, त्याच्या सान...

cc

Image
 

गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी

गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ॥१॥ गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी ॥२॥ गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥ गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान ॥४॥ शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

  आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हान्स

 महिन्याची एकादशी माझा उपवास | जाते पंढरीला माझ्या मनाची हान्स ||१|| सकाळी उठून सेडा सर्वांना | माझ्या अंगणात तुळशी वृंदावन||२|| देवाचिया द्वारा आली चंद्रभागा  | सावळा पांडुरंग किर्तनाला उभा. ||३|| जुनी सँगे सर्वजणाँला  | विसरू नको रे हरी भजनाला ||४||

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

अभंग : -    रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।  सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥  रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।  सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥  चरणकमळदळ रे भ्रमरा ।  भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥ सुमनसुगंधु रे भ्रमरा ।  पौरमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥ सौभाग्यसुंरु रे भ्रमा ।  बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥

  आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।  दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥ आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।  दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥ चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा ।  तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव |  स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया |  विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥

  लहानपण दे गा देवा ।                                        मुंगी साखरेचा रवा ॥१॥ लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर ।  तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ ज्याचे अंगीं मोठेपण ।  तया यातना कठीण ॥२॥ तुका म्हणे जाण ।  व्हावें लहानाहुनी लहान ॥३॥

रूप पाहता लोचनी | सुख झाले वो साजणी ॥१

Image
  रूप पाहता लोचनी |  सुख झाले वो साजणी ॥१ ॥ रूप पाहता लोचनी |  सुख झाले वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा |  तो हा माधव बरवा ॥२॥ बहुत सुकृतांची जोडी |  म्हणून विठ्ठले आवडी ॥३॥ सर्व सुखांचे आगर |  बाप रखुमादेवी वर ॥४॥

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।

Image
  अवघाची संसार सुखाचा करीन ।  आनंदे भरीन तिन्ही लोक । अवघाची संसार सुखाचा करीन ।  आनंदे भरीन तिन्ही लोक ।।1।। जाईन गे माये तया पंढरपूरा ।  भेटन माहेरा आपुलिया ।।2।। सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।  क्षेम मी देईन पांडूरंगा ।।3।। बापरखुमादेवीवरु विठ्ठलाची भेटी ।  आपुल्या संवसाठी करुनी ठेला ।।4।।

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्‍ति चारी साधियेल्या॥१॥

Image
  देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।  तेणे मुक्‍ति चारी साधियेल्या॥१॥ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।  तेणे मुक्‍ति चारी साधियेल्या॥१॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।  पुण्याची गणना कोण करी॥२॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।  वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।  द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥

उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

Image
उठा सकळ जन उठिले नारायण ।  आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ उठा सकळ जन उठिले नारायण ।  आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर ।  मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥ जोडोनिया कर मुख पाहा सादर ।  पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥ तुका म्हणे काय पढियंतें तें मागा ।  आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥

हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥

हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥ हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ ।  तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांही गाबाळाचे भरी ।  पडो येथे थोरी नागवण ॥ध्रु.॥ भावे तुळसीदळ पाणी जोडा हात ।  म्हणावा पतित वेळोवेळा ॥२॥ तुका म्हणे ही तंव कृपेचा सागर ।  नामासाटीं पार पाववील ॥३

आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥

आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥  आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनिया जन्मतुटी॥ध्रु.॥ आता असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पाया ॥२॥ येता निजधामी कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥

Image
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥ पंढरीसी जावे ऐसे माझे मनी।  विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।  लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।  मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥

Image
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें ।  म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें ।  म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास ।  माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥ आणिका दैवता नेघे माझें चित्त ।  गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥ भ्रमर मकरंदा मधासी ती माशी ।  तैसें या देवासी मन माझें ॥४॥ भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे ।  सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥

शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || धृ ||

Image
शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || धृ ||  शुद्ध नाही तुझी भावना  शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || धृ || आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संत येती तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना | | १ || गंध केशरी कपाळी टिळा भजन करितो वेळोवेळा शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || २ || तुकारामाने अभंग लिहिले जीवनाचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || ३ ||

उभा कसा राहिला विटेवरी| पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1||

Image
  उभा कसा राहिला विटेवरी| पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1|| उभा कसा राहिला विटेवरी| पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1|| अंगी शोभे पितांबर पिवळा| गळ्यामध्ये वैजयंती माळा | चंदनाचा टीळा माथी शोभला||2|| चला चला पंढरीला जाऊ| डोळे भरुनी विठू माउलीला पाहू| भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला ||3|| ठेवूनिया दोन्ही कर कटी| उभा हा मुकुंद वाळवंटी| हरिनामाचा झेंडा तिथे रोविला||4|| बाळ श्रावण प्रार्थी आता| नका दूर लोटू पंढरीनाथ| तव चरणी हा देह सारा वाहिला||5||

चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥

Image
  चला आळंदीला जाऊ ।  ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥  चला आळंदीला जाऊ ।  ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥ होतिल संताचिया भेटी ।  सुखाचिया सांगो गोष्टी ॥ध्रु.॥ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।  मुखीं म्हणतां चुकती फेर ॥२॥ तुम्हां जन्म नाहीं एक ।  तुका म्हणे माझी भाक ॥३॥                     ..........संत तुकाराम

जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता

Image
जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता   तुझ्या नादाने पाहिली मी   ही तुझीच रे पंढरी धन्य झालों आह्मी जन्माचे   नाम घेऊ तुझे आवडीचें   दीपवली तुझी पंढरी चालू झाली  भक्तांची वारी तुका ह्मणे भक्ती करा तुझी  जाती पापें जन्माची पळोनी -x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-

आनंद पोटात माझ्या माईना

Image
  आनंद पोटात माझ्या माईना हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला, भक्तसंकटी धावुनी आला ही वेडीवाकुडी सेवा माझी, मान्य करुनी प्रभु घेतील का आणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील का   हे तुझे भजना कसे करावे, अरे ठाऊक मजला नाही आणि तुझे भजना तूच करून घे, अरे कलावान मी नाही कोणी माना कोणी मानू नका यात आमुचे काय आणि भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय   दत्त दर्शनला जायाचं जायाचं जायाचं (आता लगीच काय? लगीच लगीच) दत्त दर्शनला जायाचं जायाचं जायाचंआनंद पोटात माझ्या (काय वाडीला?) आनंद पोटात माझ्या (औटूंबर? नरसोबाची वाडी राहिलीये) आनंद पोटात माझ्या (अरे बाबा गाणगापूर । हां, तिकडंच जाऊ या आपल) आनंद पोटात माझ्या माईना गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट या या डोळ्यांची भूक काही जाईना आनंद पोटात माझ्या माईना     रूप सावळ सुंदर गोजिरवाणं मनोहर नजरेस आणिक काही येईना आनंद पोटात माझ्या माईना   नजरबंदीचा हा खेळ खेळे सगुरू प्रेमळ खेळ खेळिता खेळ पुरा होईना आनंद पोटात माझ्या माईना   हंडीबाग पांडुरंग,...

विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||

Image
  विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ || विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ || विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||   संसार केला कोठून कोठी पोटी आले निवरती विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर | | १ ||   संसार केला छोटा मोठा पोटी आले सोपान काका विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर | | २ ||   संसार केला घाई घाई पोटी आल्या मुक्ताबाई विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर | | ३ ||   तुका म्हणे संसार केला यांचा जन्म वाया गेला विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर | | ४ ||          -x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

Image
  मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान   बालपणी होते माझे मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान   पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी, अपराधी घोर अपराधी घोर क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे....           -x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x  

चला मंगळ वेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||धृ.||

Image
  चला मंगळ वेढे पाहू  नाम विठ्ठल वि ठ्ठल घेऊ||धृ.|| चला मंगळ वेढे पाहू  नाम विठ्ठल वि ठ्ठल घेऊ||धृ.||   वाड्याच्या पडक्या भिंती, दामाची महती कथिती ती कथा मुखाने गाऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||१||     भर रस्त्यावरती साधी, ती चोखोबाची समाधी आदराने सुमने वाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ ||२||     कान्होपात्रेच्या गुरूस्थानी, आनंद मुनी महाज्ञानी ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ   नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ ||३||               -x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x

घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचे ॥

Image
  घेई घेई माझे वाचे।  गोड नाम विठोबाचे ॥  डोळे तुम्ही घ्या रे सुख।  पाहा विठोबाचे मुख ॥ धृ०॥  तुम्ही आईका रे कान।  माझ्या विठोबाचे गुण ॥  मना तेथें धांव घेईं।  राही विठोबाचे पायीं ॥  तुका म्हणे जीवा।  नको सोडूं या केशवा ।।                     ......संत तुकाराम

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Image
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी    कर कटावरी ठेवोनिया    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान   तुळसी हार गळा कांसे पितांबर तुळसी हार गळा कांसे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान   मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी आ आ आ मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजीत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान   तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान    -x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x -

गोड तुझे रूप गोड तुझे नाम || lyrics ||

Image
  गोड तुझे रूप गोड तुझे नाम || गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया  || 1 ||   गोड तुझे रूप...   विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || 2 ||   गोड तुझे रूप...   तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे || 3  ||   गोड तुझे रूप... -x-x-x-x-