रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
अभंग : -
सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडौँ तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळ रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
पौरमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
सौभाग्यसुंरु रे भ्रमा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥
भावार्थ : -
अवगुण सोडून देण्याबद्दल उपदेश येथे ज्ञानेश्वरांनी केला आहे. पण हा उपदेशही ज्ञानेश्वरांनी किती काव्यात्मक केला आहे पहा. ज्या भ्रमराला उपदेशून ते बोलताहेत, तो भ्रमर कसा? तर त्याच्या विहरण्यालाही एक नाद आहे. हा नादही अतिशय नाजूक असा आहे. अर्थात या नादामधून त्याचे स्वच्छंद विहरणे साकारून जाते. प्रथम करा हा विचार लता मंगेशकर नवीन भर परमेश्वराच्या चरणकमळाचा भोग निश्चिंतपणे घे. त्याच्या गंधामध्ये तू दंग होऊन जा. या गंधाचा तू जाणकार आहेस. असे भाग्य लाभलेल्या सुंदर भ्रमरा, विठ्ठल हाच या जगाचा एकमेव त्राता आहे हे लक्षात घे आणि त्याच्या चरणकमळावर लीन हो. रामदास कामत मानवी मनाला भ्रमर कल्पिणे यातच ज्ञानेश्वर प्रतिभेचे वेगळेपण सामावले आहे.
विद्गद - चतुर / जाणकार
सुमन - फूल.
Comments
Post a Comment