अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।

 अवघाची संसार सुखाचा करीन ।

 आनंदे भरीन तिन्ही लोक ।



अवघाची संसार सुखाचा करीन । 

आनंदे भरीन तिन्ही लोक ।।1।।

जाईन गे माये तया पंढरपूरा ।

 भेटन माहेरा आपुलिया ।।2।।

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । 

क्षेम मी देईन पांडूरंगा ।।3।।

बापरखुमादेवीवरु विठ्ठलाची भेटी । 

आपुल्या संवसाठी करुनी ठेला ।।4।।

Comments

Popular posts from this blog

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I