हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥
हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥
हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ ।
तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥
आणिका नका कांही गाबाळाचे भरी ।
पडो येथे थोरी नागवण ॥ध्रु.॥
भावे तुळसीदळ पाणी जोडा हात ।
म्हणावा पतित वेळोवेळा ॥२॥
तुका म्हणे ही तंव कृपेचा सागर ।
नामासाटीं पार पाववील ॥३
Comments
Post a Comment