उभा कसा राहिला विटेवरी| पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1||

 उभा कसा राहिला विटेवरी|

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1||




उभा कसा राहिला विटेवरी|

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला||1||


अंगी शोभे पितांबर पिवळा|

गळ्यामध्ये वैजयंती माळा |

चंदनाचा टीळा माथी शोभला||2||


चला चला पंढरीला जाऊ|

डोळे भरुनी विठू माउलीला पाहू|

भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला ||3||



ठेवूनिया दोन्ही कर कटी|

उभा हा मुकुंद वाळवंटी|

हरिनामाचा झेंडा तिथे रोविला||4||


बाळ श्रावण प्रार्थी आता|

नका दूर लोटू पंढरीनाथ|

तव चरणी हा देह सारा वाहिला||5||


Comments

Popular posts from this blog

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I