देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या॥१॥
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या॥१॥
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी॥२॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥
Comments
Post a Comment