घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचे ॥
घेई घेई माझे वाचे।
गोड नाम विठोबाचे ॥
डोळे तुम्ही घ्या रे सुख।
पाहा विठोबाचे मुख ॥ धृ०॥
तुम्ही आईका रे कान।
माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथें धांव घेईं।
राही विठोबाचे पायीं ॥
तुका म्हणे जीवा।
नको सोडूं या केशवा ।।
......संत तुकाराम
Comments
Post a Comment