आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

 आपुलिया हिता जो असे जागता ।

धन्य माता पिता तयाचिया ॥१॥



आपुलिया हिता जो असे जागता ।

धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।

तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥

गीता भागवत करिती श्रवण ।

अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥

तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।

तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥



अर्थ

ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत.ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल हरिख वाटतो .अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल 

Comments

Popular posts from this blog

विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I