चला मंगळ वेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||धृ.||
चला मंगळ वेढे पाहू
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||धृ.||
चला मंगळ वेढे पाहू
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||धृ.||
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती
ती कथा मुखाने गाऊ
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ||१||
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी
आदराने सुमने वाहू
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ ||२||
कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ ||३||
-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x

Comments
Post a Comment