आनंद पोटात माझ्या माईना हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला, भक्तसंकटी धावुनी आला ही वेडीवाकुडी सेवा माझी, मान्य करुनी प्रभु घेतील का आणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील का हे तुझे भजना कसे करावे, अरे ठाऊक मजला नाही आणि तुझे भजना तूच करून घे, अरे कलावान मी नाही कोणी माना कोणी मानू नका यात आमुचे काय आणि भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय दत्त दर्शनला जायाचं जायाचं जायाचं (आता लगीच काय? लगीच लगीच) दत्त दर्शनला जायाचं जायाचं जायाचंआनंद पोटात माझ्या (काय वाडीला?) आनंद पोटात माझ्या (औटूंबर? नरसोबाची वाडी राहिलीये) आनंद पोटात माझ्या (अरे बाबा गाणगापूर । हां, तिकडंच जाऊ या आपल) आनंद पोटात माझ्या माईना गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट या या डोळ्यांची भूक काही जाईना आनंद पोटात माझ्या माईना रूप सावळ सुंदर गोजिरवाणं मनोहर नजरेस आणिक काही येईना आनंद पोटात माझ्या माईना नजरबंदीचा हा खेळ खेळे सगुरू प्रेमळ खेळ खेळिता खेळ पुरा होईना आनंद पोटात माझ्या माईना हंडीबाग पांडुरंग,...