नाम तुझे रे नाम तुझे रे || lyrics ||
नाम तुझे रे नाम तुझे रे
नाम तुझे रे नारायणा
फोड़ी पाषाणाला पान्हा
नाम तुझे रे नारायणा।। धृ ।।
नाम तुझे रे नारायणा
नाम जपले वाल्मिकाने,
फुटले दोन त्याला पाने
।। 1 ।।
नाम तुझे रे नारायणा
आला मेला पापरासी,
तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
नाम तुझे रे नारायणा
ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
नाम तुझे रे नारायणा
x-x-x-x-x
Comments
Post a Comment