सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ॥ Lyrics ||
|| सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ||
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान ||1||
तुळसी हार गळा कांसे पितांबर |
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान ||2||
मकरकुंडले तळपती श्रवणी |
मकरकुंडले तळपती श्रवणी
आ आ आ .....
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान||3||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख |
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान ||4||

Comments
Post a Comment