गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी
गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ॥१॥ गुरु चरणाची माति तेचि माझी भागीरथी ॥२॥ गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥ गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान ॥४॥ शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥