जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I

 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I


 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I

तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥

जन्मोनि संसारी झालो त्याचा दास 
माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥

अनेक दैवता नेघे माजे चित्त I
गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥

भ्रमर सुवासी मधावरी मासी I
तैसे या देवासी माझे मन ॥४॥

नामा म्हणे मज पंढरीस न्या रे I
हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥





Comments

Popular posts from this blog

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics