विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics

विठ्ठला गुंतलो या संसारी 

नाही आठवण तुझी श्रीहरी ॥


बालपण गेले सुखात 

तारुण्य आले धोक्यात 

म्हातारपण आले दारात ॥


आला मानव या संसारी 

आपण-आपणा झाला वैरी ॥


गर्भवासी मी बहू कष्टलो 

चौर्यांशी योनी फिरुनी 

आलो गुंतलो मायाजाळीं ॥


तुका म्हणे जगां वेधले 

नटकां प्रपंच सारा ॥

Comments

Popular posts from this blog

शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || धृ ||

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥