आकल्प आयुष्य
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥l
नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
Khup chan
ReplyDelete