जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे I हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥