Posts

Showing posts from December, 2022

धन्य धन्य हो प्रदक्षिणा (Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics)

Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी। सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।। मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती। नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।। कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत। लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।। गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि। अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।। प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला। श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।

आकल्प आयुष्य

 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥ कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥ अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥l नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥